Posts

Showing posts from August, 2018

श्रीशिवलीलामृत – अध्याय सहावा

अध्याय सहावा श्रीगणेशाय नम: ॥ जय जय मदनांतक मनमोहना ॥ मदमत्सरकाननदहना ॥ हे भवभयपाशनिकृंतना भवानीरंजना भयहारका ॥१॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा ॥ सिंधुरवदनजनका कर्पुरगौरा ॥ पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा ॥ त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥२॥ नीलग्रीवा सुहास्यवदना ॥ नंदीवहना अंधकमदना ॥ गजांतका दक्षक्रतुदलना ॥ दानवदमना दयानिधे ॥३॥ अमितभक्तप्रियकरा ॥ ताटिकांतकपूज्य त्रितापहरा ॥ तुझे गुण वर्णावया दशशतवक्रा ॥ शक्ति नव्हेचि सर्वथा ॥४॥ नित्य शांत निर्विकल्प निरंजना ॥ आशा पाशमरहित विरक्त पूर्णा ॥ निजभक्तपाशविमोचना ॥ जन्ममरणमोचक जो ॥५॥ जे विषय कामनायुक्त ॥ तुज स्वामी अनन्य भजत ॥ त्यांसी पुरविसी विषयपदार्थ ॥ जे जे इच्छित सर्वही ॥६॥ सकामासी कामना पुरवुन ॥ तुं निजध्यानीं लाविसी मन ॥ ते परम विरक्त होऊन ॥ पद निर्वाण पावती ॥७॥ सोमवार शिवरात्री प्रदोष ॥ आचरतां तरले असंख्य स्त्रीपुरुष ॥ येचविषयीं कथा निर्दोष ॥ सूत सांगे शौनकादिकां ॥८॥ आर्यावर्त देश पवित्र ॥ तेथींचा चित्रवर्मा नाम नृपवर ॥ जैसे पुर्वी नल हरिश्चंद्र ॥ तैसा पुण्यशील प्रतापी ॥९॥ जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ ॥ तैसा गोविप्रपाळक न...

श्रीशिवलीलामृत – अध्याय पाचवा

अध्याय पाचवा श्रीगणेशाय नमः ॥ सदाशिव अक्षरें चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ जो नित्य शिवार्चन करी ॥ तो उद्धरी बहुतां जीवा ॥१॥ बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ॥ शास्त्रवक्ते करिती विचार ॥ परी जे शिवनामें शुद्ध साचार ॥ कासया इतर साधनें त्यां ॥२॥ नामाचा महिमा परमाद्गत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यासी सर्वसिध्दि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन ॥ संतति संपत्ति दिव्यज्ञान ॥ पाहिजे तिंहीं प्रदोषव्रत पूर्ण ॥ यथासांग करावें ॥४॥ प्रदोषव्रत भावें आचरितां ॥ या जन्मीं प्रचीत पहावी तत्वतां ॥ दारिद्र्य आणि महद्य्वथा ॥ निःशेष पळती षण्मासांत ॥५॥ एकसंवत्सरें होय ज्ञान ॥ द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण ॥ हें जो असत्य मानील व्यासवचन ॥ त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥ त्याचा गुरु लटिकाच जाण ॥ त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ॥ उमावल्लभचरणीं ज्याचे मन ॥ त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥ मृत्यु गंडांतरे दारूण ॥ प्रदोषव्रतें जाती निरसोन ॥ येविषयीं इतिहास जाण ॥ सूत सांगे शौनकां ॥८॥ विदर्भदेशींचा भूभुज ॥ सत्यरथ नामें तेजःपुंज ॥ सर्वधर्मरत पराक्रमी सहज ॥ ब...

श्रीशिवलीलामृत – अध्याय चवथा

अध्याय चवथा श्रीगणेशाय नमः ॥ धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ॥ मराळ उदार कर्पूरगौर ॥ अगम्य गुण अपार ॥ तुझे वर्णिती सर्वदा ॥१॥ न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ॥ आपणचि सर्वकर्ता कारण ॥ कोठें प्रगटेल ज्यांचें आगमन ॥ ठाई न पडे ब्रह्मादिकां ॥२॥ जाणोनि भक्तांचे मानस ॥ तेथेंचि प्रगटे जगन्निवास ॥ येचविषयीं सूतें इतिहास ॥ शौनकादिकांप्रति सांगितला ॥३॥ किरातदेशींचा राजा विमर्शन ॥ परम प्रतापी शत्रुभंजन ॥ मृगया करीत हिंसक दारूण ॥ मद्यमांसी रत सदा ॥४॥ चतुवर्णाच्या स्त्रिया भोगीत ॥ निर्दय अधमेंचि वर्तत ॥ परी शिवभजनीं असे रत ॥ विधीनें पूजित नित्य शिवासी ॥५॥ त्याचे स्त्रियेचें नाम कुमुद्वती ॥ परम चतुर गुणवती ॥ पतीप्रति पुसे एकांतीं ॥ कापट्यरीती टाकोनियां ॥६॥ म्हणे शिवव्रत आचरतां बहुवस ॥ शिवरात्रि सोमवार प्रदोष ॥ गीत नृत्य स्वयें करितां विशेष ॥ शिवलीलामृत  वर्णितां ॥७॥ दोषही घडती तुम्हांपासून ॥ इकडे शिवभजनीं सावधान ॥ मग तो राजा विमर्शन ॥ वर्तमान सांगे पुरातन पैं ॥८॥ मी पूर्वी पंपानाम नगरीं ॥ सारमेय होतों सुंदरी ॥ तों माघ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं ॥ शिवमंदिरासमोर आलों ॥९॥ शिव...

श्रीशिवलीलामृत – अध्याय दुसरा

अध्याय दुसरा  श्रीगणेशाय नमः॥ जेथें सर्वदा शिवस्मरण ॥ तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण ॥ नाना संकटें विघ्नें दारुण ॥ न बाधती कालत्रयी ॥१॥ संकेतें अथवा हास्येंकरून ॥ भलत्या मिसें घडो शिवस्मरण ॥ न कळतां परिसासी लोह जाण ॥ संघटतां सुवर्ण करी कीं ॥२॥ न कळतां प्राशिलें अमृत ॥ परी अमर करी कीं यथार्थ ॥ औषधी नेणतां भक्षित ॥ परी रोग सत्य हरी कीं ॥३॥ शुष्कतृणपर्वत अद्भुत ॥ नेणतां बाळक अकस्मात ॥ अग्निस्फुलिंग टाकीत ॥ परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥ तैसे न कळतां घडे शिवस्मरण ॥ परी सकळ दोषां होय दहन ॥ अथवा विनोदेंकरून ॥ शिवस्मरण घडो कां ॥५॥ हे कां व्यर्थ हांका फोडिती ॥ शिव शिव नामें आरडती ॥ अरे कां हे उगे न राहती ॥ हरहर गर्जती वेळोवेळां ॥६॥ शिवनामाचा करिती कोल्हाळ ॥ माझें उठविलें कपाळ ॥ शिव शिव म्हणतां वेळोवेळ ॥ काय येतें यांच्या हाता ॥७॥ ऐसी हेळणा करी क्षणक्षणीं ॥ परी उमावल्लभनाम ये वदनीं ॥ पुत्रकन्यानामेंकरूनी ॥ शिवस्मरण घडो कां ॥८॥ महाप्रीतीनें करितां शिवस्मरण ॥ आदरें करितां शिवध्यान ॥ शिवस्वरूप मानूनी ब्राह्मण ॥ संतर्पण करी सदां ॥९॥ ऐसी शिवीं आवडी धरी ॥ त्याहीमाजी आली शिवरा...